चराठा शाळेला इन्व्हर्टर देणार असल्याची  जि प. सदस्य विक्रांत सावंत यांच्याकडून ग्वाही

ओटवणे(प्रतिनिधी)

माजगाव जिल्हा परिषद चे जिल्हापरिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्याकडून चराठा येथील पी.एम.भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला इन्व्हर्टर देणार असल्याची ग्वाही दिली. येत्या आठ दिवसात शाळेत इन्व्हर्टर बसवीला जाईल.ज्या ठिकाणी शासकीय मदत असेल त्याठिकाणी शासकीय मदत मिळवून दिली जाईल मात्र प्रत्येक वेळी अत्यावश्यक सोयी सुविधांसाठी शासकीय योजनांची वाट न पाहता या शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य आपणाकडून केले जाईल अशी ग्वाही माजगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य विक्रांत सावंत यांनी दिली.

चराठा येथील पी एम भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या

कार्यक्रमात विक्रांत सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच राजन परब. माजी सरपंच बाळू वाळके, ग्रामविकास अधिकारी श्रद्धा तेंडोलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश परब , दिगंबर पावसकर, सामाजिक कार्यकर्ते राजू कुबल, बाळ्या बोंद्रे, प्रवीण सावंत, विलास परब, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर, निलेश मेस्त्री, विष्णू परब, शमिका नाईक, शिक्षिका अदिती चव्हाण, अमिषा कुंभार धनदा शिंदे, संगीत शिक्षक विजय माधव, क्रीडा शिक्षक नागेश बांदेकर आदी उपस्थित होते

शैक्षणिक सोयी व सुविधा या शाळेत उपलब्ध आहेत.पण अनेक वेळा विजेच्या समस्यामुळे लोड शेडींग मुळे यात व्यत्यय येतो आधुनिक शैक्षणिक तंत्राद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. मात्र वीज गेल्यानंतर इन्व्हर्टर नसल्याने समस्या निर्माण होते शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे ही गरज ओळखून जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी या शाळेला आठ दिवसात आवश्यक त्या क्षमतेचा इन्व्हर्टर बसवून देण्याची ग्वाही दिली. याबद्दल उपस्थित आणि विक्रांत सावंत यांचे आभार मानले.

यावेळी माजी सरपंच बाळू वाळके यानीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर यांनी सूत्रसंचालन धनदा शिंदे यांनी तर आभार अमिषा कुंभार यांनी मानलेत .