सावंतवाडी l प्रतिनिधी :गोवा येथील पणजी शहरातील मेनेझेस ब्रागांझा इन्स्टिट्यूट येथे नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा झाली. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांच्या मानसिक गणित कौशल्याची, वेगवान गणना क्षमता आणि एकाग्रतेची कसोटी पाहणारी ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यात सिधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली जिल्ह्यातील विविध अबँकस संस्थांमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पारितोषिके पटकावली.या स्पर्धेत डॉन बॉस्को हायस्कूल ओरसचा विद्यार्थी कु. हर्ष प्रशांत परब याने व्दितीय क्रमांक मिळवत G6 ही लेवल मिळवली त्याला गीतांजली पालन यांचे मार्गदर्शन लाभले.
या हर्ष प्रशांत परब यांने अबॅकस मध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे













