नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या वतीने आज दंगा नियंत्रण योजना मोहीम राबविण्यात आली. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या विशेष सराव मोहिमेत पोलीस, अग्निशमन दल आणि महानगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी सहभागी झाले होते. कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती किंवा दंगलीसारखी घटना घडल्यास त्यावर तातडीने आणि प्रभावीपणे नियंत्रण कसे मिळवायचे, याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. विविध यंत्रणांमधील समन्वय वाढविणे आणि आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी तपासणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.













