मठ ग्रामपंचायत उपसरपंच पदी सिद्धी गावडे यांची एकमताने निवड

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. सोनिया उमेश मठकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन उपसरपंच पदी सौ. सिद्धी हेमंत गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडी नंतर सिद्धी गावडे यांचे अभिनंदन करण्यात आले.

मठ ग्रामपंचायत कार्यालयात आज, दिनांक १७ जून २०२६ रोजी विशेष बैठक घेऊन ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी श्री.विकास केळुसकर यांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले. या निवड प्रसंगी गावातील प्रमुख पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने पंचायत समिती सदस्य श्री. नितीन रामचंद्र मांजरेकर, मठ सरपंच सौ. रुपाली अजित नाईक, माजी उपसरपंच सौ. सोनिया उमेश मठकर, भाजप मंडळ सदस्य श्री. सुभाष चंद्रकांत बोवलेकर, श्री. रविंद्र विष्णू खानोलकर यांच्यासह श्री. अजित कृष्णा नाईक, श्री. महेश धुरी, श्री. संतोष वायंगणकर, श्री. रामचंद्र परब, श्री. प्रकाश गावडे, श्री. उमेश मठकर, श्री. हेमंत गावडे, श्री. मिलिंद मठकर, श्री. स्वप्नील मठकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. कविता आशिष बोवलेकर आणि सौ. शामिका सुरेंद्र मठकर आदी मान्यवर उपस्थित होते.