घराच्या दर्शनी भागाच्या दरवाजाची कडीकोयंडा उचकटून ९० हजार रुपयांच्या रक्कमेवर डल्ला

लांजा गोंडेसखल येथील घटना, चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद

लांजा (प्रतिनिधी) :घराच्या दर्शनी दरवाजाची कडी कोयंदा उचकटून चोरट्याने घरामध्ये प्रवेश करत बेडरूम मध्ये असलेल्या लाकडी कपाटा तील ९० हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना लांजा गोंडेसखल रोड तेथे भर वस्तीत घडली आहे.
या घटनेने लांजा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सदर चोरटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत यांचा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा गोंडेसखल रोड येथिल रवींद्र राजाराम पावसकर (६०, राहणार गोंडेसखल रोड) यांनी याबाबतची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. ही घटना दि. १६ जून रोजी रात्री ९.३० ते दिनांक १७ जून रोजी दुपारी १.५५ या कालावधीत घडली आहे. रवींद्र पावसकर ये कामानिमित्ताने बाहेर गेले होते. दिनांक १७ जून रोजी दुपारी १.५५ वाजता घरी आले असता घराच्या दर्शनी दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरवाजाची कडी कोयंडा उचकटल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता हॉलमध्ये सर्व काही ठीकठाक होते. त्यानंतर त्यांनी बेडरूम मध्ये जाऊन पाहिले असता बेडरूम मध्ये असलेल्या लाकडी कपाटातील उजव्या ड्रॉवरमध्ये मुलाच्या आजारपणासाठी ठेवलेली ९० हजार रुपयांचे रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली .
याबाबत त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ प्रमाणे, भागविक ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. डी.जाधव हे करत आहेत