आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहरात विकासकामांचा धडाका सुरूच  

१३ कोटींच्या तीन विकासकामांचे भूमिपूजन 

आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती 

पारदर्शक आणि दर्जेदार विकास कामांना प्राधान्य 

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील महत्त्वपूर्ण अश्या पर्यटन व सांस्कृतिक स्थळांच्या सुशोभिकरण साठी सुमारे १३ कोटी निधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा ममता वराडकर व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

मालवण शहरातील पर्यटन आणि नागरिक सोयी-सुविधांना चालना देण्यासाठी आमदार निलेश राणे मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून घेत आहेत. नुकताच त्यांनी 13 कोटी निधी मंजूर करून आणला असून यापैकी तीन प्रमुख प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मामा वरेरकर नाट्यगृहाच्या नूतनीकरण साठी ₹१० कोटी निधी मंजूर केला. सोबतच नाट्यगृह दुरुस्तीसाठी 1 कोटी निधी प्राप्त झाला. तसेच आणखी 3 कोटी 50 लाख निधी पहिल्या टप्प्यातील नूतनीकरण काम पुर्ण झाल्यावर प्राप्त होणार आहेत. असा एकूण 14 कोटी 50 लाख निधी मंजूर झाला आहे. या बहुप्रतीक्षित विकासकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत वातावरणात संपन्न झाला. यासोबत मालवण नगरपरिषदेच्या रॉक गार्डन पर्यटनस्थळाच्या सुशोभीकरण व मूलभूत सुविधा विकासासाठी ₹१ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून, या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. तसेच मालवण नगरपरिषद नमो उद्यान विकसित करण्यासाठी ₹१ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून, या महत्त्वपूर्ण विकासकामाचा भूमिपूजन सोहळा शहरातील गवंडीवाडा येथे संपन्न झाला.

 

मालवण शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या महत्त्वाकांक्षी विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेवक महेश कांदळकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, कुडाळ मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, ललित चव्हाण, विकी तोरसकर, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, निना मुंबरकर, मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, पस सदस्य बंडू चव्हाण, भालचंद्र केळूस्कर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, जगदीश गांवकर, सूर्यकांत फणसेकर, बाळू तारी, भाऊ मोरजे, शाम वाक्कर, मोहन वराडकर, परशुराम पाटकर, जॉन नरोना, राजू बिडये, अभय कदम, महेश सारंग, बाबू धुरी, शिवाजी केळूसकर, संतोष पालव, वसंत गांवकर, अखिलेश शिंदे, निकीत वराडकर, आबा शिर्सेकर, निनाद बादेकर, प्रसाद परुळेकर, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, महिला पदाधिकारी तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, स्नेहा घाडीगावकर, रश्मी तुळसकर, मंदा जोशी, लुद्दीन फर्नांडिस, स्मिता प्रभाळे, अंजना सामंत, सौं. पाटकर, सौं. हरमलकर यांसह पदाधिकारी, नगरपरिषद कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. भूमिपूजन पोरोहित विलास अभंकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तर संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

 

*आमदार निलेश राणे यांच्याचमुळे विकासनिधी कोटीच्या पुढेच : सभापती पुनम चव्हाण*

 

मालवण शहराच्या गतिमान विकासासाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आम्ही कटीबद्ध कटीबद्ध आहोत. निलेश राणे आमदार झाले त्या नंतर विकास कामांसाठी कोटीचे आकडे येत आहे. एवढा निधी मागील दहा वर्षात कधीच आला नाही. विकास गतिमान पद्धतीने सुरु आहे. आमदार निलेश राणे म्हणजे विकासाची दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व आहेत . मालवण शहराच्या गतिमान विकासासाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आम्ही कटीबद्ध आहोत, असे स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी सांगितले.

 

*आमदार निलेश राणे विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व : नगराध्यक्षा ममता वराडकर*

 

आमदार निलेश राणे विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहेत. मालवण शहराच्या विकासासाठी नेहमीच त्यांचा लक्ष असतो. मोठया प्रमाणात विकासनिधी त्यांनी प्राप्त करून दिला आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्ग, वाहतूक नियोजन दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु असून अत्यंत महत्वपूर्ण असे हे कामही लवकर पुर्ण होईल. जनतेची सेवा आणि शहर विकासाचा ध्यास घेऊन आदर्श मालवण शहर बनवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वात गतिमान वाटचालीस सुरु आहे. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.

 

*मालवण कुडाळच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध : दत्ता सामंत*

 

आमदार निलेश राणे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आहेत. माजी मुख्यमंत्री खासदार राणे साहेबानी त्यावेळी मोठया प्रमाणात निधी मंजूर करून मालवणात दिमाखदार असे नाट्यगृह उभारले. आता यां नाट्यगृहच्या नूतनीकरण व अद्ययावत सेवा सुविधा साठी सुमारे 14 कोटी 50 लाख निधी आमदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून मंजूर करून घेतला. रॉक गार्डन, नमो उद्यान यासाठी 2 कोटी निधी मंजूर झाला. रस्ते, गटार बंधारे व अन्य विकास कामासाठी शेकडो कोटी निधी मंजूर केला आहे. लवकरच 42 कोटीची नळपाणी योजना पुर्ण होईल त्यासोबत गेली अनेक वर्षे रखडलेली भुयारी गटार योजनाही लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी बायपास मार्गही लवकर होईल. जी आश्वासने निवडणुकीत दिली त्याच्या डबल कामे आमदार निलेश राणे यांनी वर्षभरात केली. विकास कामांचा धडाका सुरुच राहील. मागील आमदारानी दहा वर्षात काहीच केले नाही. मात्र विकासाचा बॅकलॉग भरून काढतांना कितीतरी जास्त पटीने आमदार निलेश राणे कार्य करत आहेत. एकट्या देवबाग किनारपट्टीवर बंधारा व सुरक्षेच्या दृष्टीने 200 कोटी मंजूर असून तालुक्यात अन्य किनारपट्टी भागातही बंधारा बांधणीसाठी शेकडो कोटी मंजूर आहेत. जनतेला केंद्र स्थानी ठेवून विकासकामे होत असताना ती पारदर्शक आणि दर्जेदार हेच त्यांचे लक्ष आहे. मालवण कुडाळच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध आहेत. असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.