देवगड : महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री Nitesh Rane यांच्या २३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष देवगड-जामसंडे शहराच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी दिली.
या उपक्रमांची सुरुवात रविवार, दि. २१ जून रोजी होणार असून, मत्स्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत विशेष शिबिराचे आयोजन सांस्कृतिक भवन, जामसंडे येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ शहरातील मच्छीमार बांधवांनी घ्यावा, असे आवाहन मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर आणि युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील यांनी केले आहे.
सोमवार, दि. २२ जून रोजी प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपा शहराध्यक्ष वैभव करंगुटकर व माजी नगरसेवक संजय तारकर यांच्या सौजन्याने सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. २३ जून रोजी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. श्री देव ब्राह्मणदेव मंदिर येथे सकाळी ८ वाजता नितेश राणे यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्यामंदिर येथील पाच गरीब व गरजू विद्यार्थ्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च वैभव करंगुटकर यांच्या सौजन्याने उचलण्यात येणार आहे.
याशिवाय विविध प्रभागांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर, रेनकोट व खाऊ वाटप, महिलांना छत्री वाटप, मच्छी विक्रेत्या महिलांना छत्री वितरण, मच्छीमार बांधवांसाठी विमा संरक्षण पॉलिसी सुरू करणे, ज्येष्ठ नागरिकांना वृक्ष वाटप व वृक्षारोपण असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमांना आमदार Ajit Gogte, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ तसेच शहरातील आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख आणि बूथ अध्यक्ष उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.











