असंवेदनशील नगर परिषदेच्या कामांना नेमका मुहूर्त कोणता ?

कामांमुळे रत्नागिरी शहरातील जेल रोड नाका पॅक
जीवघेण्या उन्हात वाहनचालकांना होतोय प्रचंड त्रास

रत्नागिरी । प्रतिनिधी:
पाऊस पडत नसला तरीही हा कालावधी पावसाळ्याचा म्हणून गणला जातो त्यामुळेच रस्ते गटारे ही कामे १५ मे पूर्वीच संपवली जातात हा नियम आहे. मात्र पाऊस आपल्यासाठीच दडून बसला आहे अशा धर्तीवर सध्या रत्नागिरी नगर परिषदेने विकास कामांच्या ऐन पावसाळी दिवसात धडाका लावला आहे. पावूस पडत नसल्याचं फायदा उचलला जात आहे. मात्र याचा मोठा मनस्ताप सर्वसामान्य जनतेला होत आहे.
आज जेल रोड नाका येथील कामाना मुहूर्त मिळाला त्यामुळे हा शहराच्या मुख्य रस्त्याच्या एक भाग ऐन रहदारीच्या काळात बंद आहे. त्यात धरून १२ वाजल्यापासून भर दुपारी येथे चारही बाजूने ट्रैफिक जाम झाले असून वाहनचालक हैराण झाले आहेत. दुचाकीस्वरांचे तर कडकडीत उन्हाने हाल झाले आहेत.
शाळा महाविद्यालये सुटण्याची ही वेळ आहे. लहान मुले महिला वृध्द माणसे या ट्रैफिक मधे असतात. अशावेळी नगर परिषद असंवेदनशील काही काय असू शकते असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
पण नागरिकांसाठी कामे करतो मग काहीही करणार या आविर्भावात सध्या नगर पालिका प्रशासन काम करते आहे की काय असा प्रश्न आता पडत आहे. यावर नेमका अंकुश कोण ठेवणार आणि नागरिकांच्या समस्याकडे पाहणार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.