राजापूर (वार्ताहर): नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरू होणाऱ्या इयत्ता चौथीच्या मराठी बालभारती या पुस्तकात येथील प्रसिध्द बालसाहित्यिक मदन हजेरी यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकात त्यांची ‘फुलपाखरे’ ही कविता ‘झिम्मड झिम्मा’ या कविता संग्रहातून घेण्यात आली आहे.
श्री. हजेरी हे बालसाहित्यिक असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राजापूर तालुक्यात ग्रंथालय चळवळ रूजावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. तर या चळवळीत ते सक्रीय कार्यरत आहेत.
या आधीही श्री. हजेरी यांचे अन्य साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमात त्यांच्या कथा तर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील मराठीच्या अनुवाद विषयक अभ्यासक्रमात दोन पुस्तकांचा समावेश झाला आहे. आजही ते बालसाहित्य लेखन, प्रकाशन कार्यात ते कार्यरत आहेत.
फोटो मदन हजेरी












