राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा २१ जून रोजी ‘रौप्य महोत्सवी सांगता सोहळा’

राजापूर (वार्ताहर): स्थानिक पातळीवर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राजापूर’ या संस्थेला यशस्वी पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने संस्थेचा ‘रौप्य महोत्सवी सांगता सोहळा’ रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. शितल सु. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली गुजराळी येथील ‘श्रीमंगल कार्यालय’ येथे होणार आहे.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत, रत्नागिरी जिल्ह्याचे सहकार संस्था उपनिबंधक डॉ. सोपानराव शिंदे आणि पतसंस्थेच्या संस्थापिका श्रीम. अनिता अभ्यंकर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राजापूरचे तहसीलदार विकास गमरे, राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. हुस्नबानू खलिफे, पंचायत समिती सभापती श्रीम. नंदिनी कदम, र.जि.म.स. बँक रत्नागिरीच्या संचालिका सौ. मुग्धा करंबेळकर, राजापूरचे सहाय्यक निबंधक संतोषकुमार पाटील आणि लेखा परीक्षक निलेश पाटणकर हे देखील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सन २००१ ते २०२६ या २५ वर्षांच्या कालावधीत संस्थेने अत्यंत उल्लेखनीय आणि पारदर्शक कामगिरी केली आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार आणि हितचिंतक यांनी या सोहळ्याला आपली स्नेहपूर्ण उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सौ. शुभांगी सोलगावकर, सचिव सौ. प्रेरणा अमरे तसेच संचालक मंडळ व कर्मचारी वृंदाने केले आहे.
लोगो महिला पतपेढी