Breaking News : साखरोळी येथे सापडला हाडांचा सांगाडा

खेड प्रतिनिधी

खेड दापोली मार्गावरील साखरोळी येथे मानवी हाडांचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली.

रविवारी सायंकाळी हा सापळा सापडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

या ठिकाणी सापडलेला हाडांचा सांगाडा हा कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून समोर येत आहे.

नेमका हा सांगाडा पुरुष जातीचा की स्त्रीचा याचा मात्र काही उलगडा झाला नसला तरी खेड पोलीस कसून तपास करत आहेत.