देवगड एज्युकेशन बोर्डच्या संगणक प्रशिक्षण केंद्राचे २५ जून रोजी उद्घाटन

 

देवगड | प्रतिनिधी :

देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई संचलित शेठ. म. ग. हायस्कूल, देवगड येथे ‘निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित संगणक प्रशिक्षण केंद्र’ या नव्या संगणक प्रशिक्षण केंद्राच्या नामफलक अनावरण व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता शेठ. म. ग. हायस्कूल, देवगड येथे होणार आहे.

या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन प्रमुख देणगीदार मा. श्री. निरंजन निळकंठ दीक्षित यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाला डॉ. खंडेराव बोरफळकर (अध्यक्ष, स्थानिक समिती) व ॲड. अविनाश माणगावकर (सचिव, स्थानिक समिती) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या डिजिटल कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास देवगड एज्युकेशन बोर्डचे पदाधिकारी, स्थानिक समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.