गुहागरात पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला दुबार पेरणीचे संकट टळले

गुहागर प्रतिनिधी:
गेले कित्येक दिवस उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गाला अखेर पावसाने दिलासा दिला आहे. रविवारी रात्रीपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मे महिन्याच्या अखेरीस पेरणी केल्यानंतर सुरुवातीला दोन दिवस पडल्यानंतर जवळपास जून संपायला आला असताना देखील पावसाने हजेरी लावली नसल्याने येथील शेतकरी वर्ग धास्तावला होता. उन्हामुळे शेतात उगवलेले रोप सुकून जाण्याची चिन्हे निर्माण झाली होती. यामुळे दुबार पेरणीचे संकट येथील शेतकऱ्यावर निर्माण झाले असतानाच अखेर रविवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
सोमवारी देखील पावसाने चांगली हजेरी तालुक्यात लावली.साहजिकच पावसाच्या आगमनाने आता येथील शेतकरी पुन्हा शेतीकामात व्यस्त होणार आहे.