सावंतवाडी पंचायत समिती सदस्य प्रशिक्षणासाठी पुण्यात 

सावंतवाडी : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष क्षमता बांधणी प्रशिक्षणासाठी सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सदस्य पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे रवाना झाले आहेत.

 

यामध्ये सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव आणि उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, प्रथमेश सावंत, प्रणाली टिळवे, प्राजक्ता केळुसकर, नेहा कांबळी, प्रशांत सुकी, मायकल डिसोजा, सदाशिव राणे, महेश धुरी, शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये यांचा समावेश आहे.