भाजपा कार्यकर्ते पोपट घागरे यांचा उपक्रम
वैभववाडी प्रतिनिधी
तिरवडे तर्फ सौंदळ गावातील विद्यार्थी व नागरिकांना जवळपास 200 छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यकर्ते पोपट घागरे यांच्यामार्फत या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
वैभववाडी पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे व माजी उपसभापती भालचंद्र साठे यांच्या उपस्थितीत या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच मनोहर घागरे, भाजपा कार्यकर्ते पोपट घागरे, बूथ अध्यक्ष उमेश घागरे, अनिल घागरे व ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









