मुसळधार पावसामुळे महामार्गाच्या अपूर्ण कामाची पोलखोल

खालचा फगरवठार येथील घरांसमोर साचला चिखल 

रत्नागिरी प्रतिनिधी

उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने सुरुवात झाल्यापासूनच रत्नागिरी शहरात दणादण उडवली असून मंगळवारी सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

या पावसामुळे रत्नागिरी शहरातील खालचा फगरवठार येथील पाटणकर आणि दीक्षित यांच्या घरच्या अंगणात पाणी माती चिखल वाहून आला आहे

महामार्गाच्या अपूर्ण कामाचा फटका या घराना बसला असून रस्त्याच्या कामाची दशा झाली आहे

येथील सखल भागातील घरे धोक्यात आली असून चिखल घरात येईल अशी स्थिती आहे