ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे विविध उपक्रम

*देवगड कणकवली वैभववाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे विविध समाज उपयोगी कामांचे आयोजन*

शिरगाव तोरसोळे फाटा येथे S.T निवारा शेडचे लोकार्पण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांनी श्रीफळ वाढवून तसेच शिरगाव जि. प. सदस्य श्री.देवदत्त कदम आणि पंचायत समिती सदस्य शीतल तावडे सरपंच सौ.तेजस्विनी पवार यांच्या हस्ते फीत कापून एसटी निवारा शेडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. अमित साटम, शिरगाव जिल्हा परिषद सदस्य श्री.देवदत्त कदम, राजेंद्र शेट्ये, संतोष फाटक, नंदू देसाई ,मंगेश लोके, महेश पवार, वैभव साळसकर, सत्यवान भोगले, सुहास राणे, अरविंद पवार, ऋतुजा पवार,गायत्री पवार,रवींद्र पवार,दयानंद राणे,राकेश चौकेकर,

इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त होत आहे.