विजयदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुरळ जि. प. सदस्य संजय बोंबडी यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यामध्ये गिर्ये कोठारवाडी प्राथमिक शाळेत वह्या व खाऊ वाटप करण्यात आले. गिर्ये, रामेश्वर आणि विजयदुर्ग ग्रामपंचायत येथे ORS पॅकेट खडपे नर्स व आशा सेविकांच्या ताब्यात देऊन वाटप करण्यात आले. विजयदुर्ग प्राथमिक शाळा व ऊर्दु शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. दरम्यान, विजयदुर्ग शक्ती केंद्र प्रमुख प्रसाद देवधर यांच्या गो शाळेमध्ये गो मातेचे पुजन करुन खाद्य वाटप करण्यात आले. तसेच तिर्लोट,फणसे,पुरळ,पडवणे येथे शाळेच्या विद्याथ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. रामेश्वर येथे आधार कार्ड व पी. एम. किसान कार्डाचा कॅम्प घेण्यात आला.
यावेळी जि.प. गटनेते संजय बोंबडी, पं.स.गटनेत्या संजना आळवे, पं.स.सदस्य रविंद्र तिर्लोटकर, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, गिर्ये सरपंच लता गिरकर, विजयदुर्ग माजी उपसरपंच महेश बिडये, विजयदुर्ग माजी सरपंच प्रसाद देवधर, रामेश्वर माजी सरपंच विनोद सुके, गिर्ये माजी उपसरपंच प्रल्हाद घाडी, गिर्ये माजी उपसरपंच विपुल आंबेरकर, बुथअध्यक्ष संदीप पुजारे, प्रकाश पुजारे, दिपक पुरळकर, अनिल गिरकर, दिनेश जावकर तसेच अन्य बुथअध्यक्ष आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












