वडाचापाट येथे पालकमंत्री नितेश राणे वाढदिवसा निमित्त विध्यार्थी गुणगौरव!

मसुरे | झुंजार पेडणेकर :             राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाचापाट येथे स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. तसेच इयत्ता पहिली ते सातवीमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाने गावाचे व जिल्ह्याचे नाव रोशन करावे असे माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई यावेळी म्हणाले.

यावेळी सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे , ग्रामपंचायत सदस्य विनायक प्रभुदेसाई, ग्रामपंचायत सदस्य माळकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. लक्ष्मण सरमळकर, शाळेचे शिक्षक पवार सर, आलो मॅडम, परब मॅडम, अंगणवाडी सेविका, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री गणेश तावडे विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ श्री पाटकर.श्री कासले तसेच विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षकानी विशेष परिश्रम घेतले.