सावंतवाडीत जुलैपासून ‘देवनागरी सुलेखन’ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सचा उपक्रम : प्रवेश सुरू

सावंतवाडी । प्रतिनिधी :“सुंदर अक्षर ही केवळ सवय नाही, तर ती एक कला आहे,” याच उद्देशाला समोर ठेवून येथील नामांकित ‘बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स’ संस्थेच्या वतीने येत्या जुलै २०२६ पासून विशेष ‘देवनागरी सुलेखन (Calligraphy) प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ अंतर्गत सुरू होणाऱ्या या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे.

या प्रशिक्षण वर्गाचे स्वरूप कलाप्रेमींसाठी अत्यंत सुटसुटीत ठेवण्यात आले असून, दर शनिवारी दुपारी ३.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत हे वर्ग चालणार आहेत. यामध्ये अगदी ५ वर्षांच्या मुलांपासून ते सुलेखन कला शिकण्याची आवड असलेल्या कोणत्याही वयोगटातील नागरिकांपर्यंत सर्वांसाठी प्रवेश खुले ठेवण्यात आले आहेत. या वर्गासाठी प्रति महिना ६००/- रुपये इतके माफक प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या प्रशिक्षणार्थींना अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे थेट मार्गदर्शन लाभणार आहे. केवळ सैद्धांतिक माहिती न देता, वर्गात नियमित सरावावर विशेष भर दिला जाईल. याशिवाय, सुलेखनातील नव्या तंत्रांचा आणि विविध प्रयोगांचा परिचय करून देण्यासाठी विशेष प्रात्यक्षिके व कार्यशाळांचेही आयोजन केले जाणार आहे.

या वर्गासाठी जागा मर्यादित असल्यामुळे इच्छुकांनी आजच आपली नावनोंदणी निश्चित करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रशिक्षण स्थळ:

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स,

सर्व्हे नं. ५४/०१, फॉरेस्ट भवनजवळ, सावंतवाडी.

अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी इच्छुकांनी प्रा. सिद्धेश नेरुरकर (मोबाईल क्र. ९४२०२६०९०३) यांच्याशी संपर्क साधावा, असे महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.