सावंतवाडी : स्वराज्य फिजिकल अकॅडमी, सावंतवाडीच्या धावपटूंनी जिद्द, चिकाटी आणि शारीरिक क्षमतेचा उत्कृष्ट नमुना सादर करत मॅरेथॉन रनमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.
अकॅडमीच्या आदित्य लांबेर, विनीत परब, अभिनव जाधव, सर्वेश गावडे आणि हर्ष गोसावी यांनी सावंतवाडी गावळी तिठा ते आंबोली कमान हा ३२.७ किलोमीटरचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला.
तसेच अनुश्री जाधव आणि खुशी खरात यांनी सावंतवाडी ते दाणोली हा १९.९ किलोमीटरचा रन यशस्वीरित्या पूर्ण करत आपली जिद्द आणि सहनशक्ती सिद्ध केली.
या उपक्रमात स्वराज्य फिजिकल अकॅडमीचे संचालक व प्रशिक्षक हर्ष जाधव यांनीही धावपटूंसोबत सहभाग घेत त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
या यशस्वी उपक्रमामुळे परिसरातील युवक-युवतींमध्ये फिटनेस, शिस्त आणि नियमित व्यायामाबाबत जागरूकता निर्माण होत असून, सहभागी सर्व धावपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.













