मसुरे | झुंजार पेडणेकर खरारेवाडीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप
कै. दिनेश विष्णू सावंत यांच्या स्मरणार्थ श्री अमित व कौशिक दिनेश सावंत यांच्यातर्फे श्री विठ्ठल मंदिर खरारे
येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रमास श्री पुनाशी खरारे वाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई व स्थानिक मंडळ याचा मोठा सहभाग लाभला.
गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष श्री कौशिक सावंत व अमित सावंत याचे अनेक वर्ष सहकार्य लाभले आहे.
सिद्वेश्वर ग्रामोनिती मंडळ स्थानिक मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल सावंत यानी मार्गदर्शन केले.
मंडळाचे सलागार श्री सुनील सावंत, शरद सावंत, विजय सावंत, श्री सत्यवान सावंत, श्रीकृष्ण सावंत, संदीप सावंत, प्रवीण सावंत, सुहास साटम उपस्थित होते
कु. प्रिया पेंडूरकर हीची इस्रो द्वाऱ्या साठी निवड झाली त्याबद्दल तसेच प्राची संभाजी परब,
रिया संभाजी परब यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मंडळाचे सचिव श्री संजय सावंत याने केले.













