आबलोली येथील सर्पमित्राकडून जीवदान
गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री बलवंत गोडबोले यांच्या बंद घरात बाथरूममध्ये असलेल्या अजगराला आबलोली येथील सर्पमित्र जय काजरोळकर याने सुरक्षित पकडून जी दिले.
रविवार सकाळी कोतळूक येथील बंद असलेल्या या घरात साफसफाई करताना घर उघडले असताना सौ. दिपाली सचिन ओक यांना हा अजगर निदर्शनास आल्यानंतर तात्काळ वनविभाग व सर्पमित्र आबलोली येथील जय काजरोळकर यांना संपर्क साधला तातडीने जय काजरोळकर याने त्या ठिकाणी येऊन १०ते १२ फुट लांब साधारण १४ ते १५ किलो वजनाचा जिवंत अजगर सुरक्षितपणे कोणतीही इजा न करता त्याला पकडून जिवदान दिले. जय काजरोळकर याला समीर ओक, संजय बाधावटे, सुनिल भेकरे, पराग नार्वेकर, मंदार गुहागरकर, प्रकाश नार्वेकर, अनू आरेकर, सौरभ आरेकर यांनी सहकार्य केले.












