रत्नागिरी:
मुरलीधर मंदिर, बंदर रोड, रत्नागिरी येथे गेली ५७ वर्षे वास्तव्यास असलेल्या आणि आपल्या स्वादिष्ट व घरगुती ‘आवळावडी’ व ‘पाचक’ या उत्पादनांमुळे रत्नागिरीसह संपूर्ण परिसरात सर्वपरिचित असलेल्या सौ. रोहिणी विष्णू गोगटे यांचे शनिवार, दिनांक २० जून २०२६ रोजी सायंकाळी पुणे मुक्कामी असताना दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
सौ. रोहिणी गोगटे या रत्नागिरी आय.टी.आय. (ITI) येथे तब्बल ३५ वर्षे अविरत सेवा बजावलेले श्री. विष्णू लक्ष्मण गोगटे यांच्या पत्नी होत. गोगटे कुटुंबियांनी आपल्या दर्जेदार उत्पादनांच्या माध्यमातून रत्नागिरीकरांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. सौ. रोहिणी गोगटे यांच्या निधनाने बंदर रोड परिसरासह संपूर्ण रत्नागिरीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
शनिवारी सायंकाळी त्यांचे निधन झाल्यानंतर, त्याच दिवशी रात्री उशिरा पुणे येथेच त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पती श्री. विष्णू गोगटे, मुली, मुलगा, सुना, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.












