रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे या संशयावरून एका इसमावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गुहागर कीर्तनवाडी येथील रहिवासी मंगेश काशिनाथ माटल (वय ४३) हे ६ जुलै २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील शेडमध्ये गणपतीची मूर्ती रंगवण्याचे काम करत होते. त्याच वेळी संशयित आरोपी संदिप तुकाराम गिजे (वय ४९, रा. गुहागर वरचापाट) हातात कोयता घेऊन तिथे आला आणि संशय व्यक्त करत मंगेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली. संशयित आरोपीने मंगेश यांच्या उजव्या गालावर, उजव्या कानाच्या मागे डोक्यावर आणि उजव्या खांद्याच्या पाठीमागे कोयत्याने सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या जीवघेण्या हल्ल्यानंतर मंगेश माटल यांनी आरडाओरड केली असता, त्यांची पत्नी मानसी माटल तातडीने तिथे धावून आली. तिला पाहताच संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर मानसी यांनी शेजारी अनिल सखाराम जोशी यांच्या मदतीने जखमी मंगेश यांना तातडीने गुहागर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी ६ जुलै रोजी सायंकाळी ५:२५ वाजता गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१) (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत कारवाई करत संशयित आरोपी संदिप गिजे याला त्याच रात्री ११:२८ वाजता अटक केली आहे.












