सहकार सप्ताहानिमित्त राजापूर महिला पतसंस्थेच्या वतीने कोदवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

राजापूर (वार्ताहर): सहकार सप्ताहानिमित्त सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, राजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोदवली येथील श्री महाकाली शंकरेशवर मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राजापूर येथील सहाय्यक सहकारी अधिकारी मुरलीधर भगवान कणखर, पंचायत समिती उपसभापती अभिजीत गुरव तसेच राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा शितल पटेल, उपाध्यक्ष शुभांगी सोलगावकर व संचालक शिल्पा मराठे, श्रृती ताम्हनकर, अरूणा शेवडे, सुधा चव्हाण, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा अमरे यांसह सर्व कर्मचारी, पिग्मि एजंट सभासद तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमात पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती तसेच वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित सर्वांनी वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करून पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समिती उपसभापती अभिजित गूरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.