(प्रतिनिधी ) पावसाळा सुरु झाला आणि नेहमीप्रमाणे पुनः एकदा वीज वितरणच्या नावाने सर्वत्र बोंब सुरु झाली आहे.गेला महिनाभर चराठा तसेच ओटवणे, ओटवणे दशक्रोशीत विजेचा सातत्याने लंपंडाव सुरु आहे.परिसरात गेले काही दिवसतर सातत्याने वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.याचा जाब विचारण्यासाठी ओटवणे सह चराठा गावातील ग्रामस्थानी सावंतवाडी येथील वीज महावितरण कार्यालयावर थेट मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडले.ओटवणे आणि दशक्रोशीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच लहान मोठे उद्योग करणाऱ्याना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना याची काहीच फिकीर नसल्यामुळेच परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप यावेळी ओटवणे ग्रामस्थांकडून करण्यात आला .
यावेळी महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वीज वितरणचा निषेध करण्यात आला.नियमित वीज पुरवठा सुरू करावा, वारंवार होणारा विजेचा लपंडाव यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा वीज बिल घेवून येऊन येऊ नये असा सज्जड दम अधिकाऱ्यांना भरला.
यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील,असे आश्वासन वीज वितरण कढून देण्यात आले.मात्र, ठोस कार्यवाही होत नाही तो पर्यंत ग्रामस्थ उपोषणावर ठाम होते.या मोर्चात चराठा वासिय तसेच ओटवणे येथील रवींद्र म्हापसेकर, सत्यवान गावकर, मुन्ना पनासे, संतोष तावडे, गुंडू जाधव,अनंत तावडे, संतोष भैरवकर, सगुण गावकर,अमेय गावडे, जयगणेश गावकर,मंगेश भिसे, गुरु बुराण,मिलिंद म्हापसेकर,रवींद्र कुडाळकर,विजय गावकर, अजय केळूसकर,गजा तावडे,बाळू पनासे,समीर गोडकर,मिलिंद म्हापसेकर,विजय गावकर, भावेश बिले,पनासे आदी ओटवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आक्रमक ओटवणे ग्रामस्थांनी थेट अधिकाऱ्यांनाच स्पॉट वर घेवून येत वस्तूस्थिती ची जाणीव करून दिली. वीज वितरणाच्या भोंगळ कारभारा बद्दल नेहमीच आवाज उठविणाऱ्या ओटवणे वासियांच्या मागणीला सखारात्मक प्रतिसाद देत सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन वीज वितरण अधिकाऱ्यांनी दिले.













