कुडाळ येथे सिंधुदुर्ग पारंपारिक दशावतार बहुउद्देशीय संघाची झाली पत्रकार परिषद
कुडाळ प्रतिनिधी
दशावतार कलावंतांना राजश्रय देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी जो विधानसभेत आवाज उठवला त्याबद्दल त्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत असे सिंधुदुर्ग पारंपारिक दशावतार दशावतार बहुउद्देशीय संघाचे अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगून शासन दशावतार कलावंतांचे जे काय पॅकेज तयार करेल त्याचा लाभ हा थेट कलावंतांपर्यंत पोहोचला पाहिजे याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पारंपारिक दशावतार दशावतार बहुउद्देशीय संघाच्या वतीने कुडाळ येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर,
संतोष रेडकर, चारू मांजरेकर, पप्पू नांदोसकर, विलास तेंडोलकर, सुरेश गुरव, प्रसाद शिरोडकर, सुरेश गुरव, यश जळवी, संतोष रेडकर, गुरु मेस्त्री, पुरुषोत्तम खेडेकर, दत्तप्रसाद शेणई, उदय मोर्ये, नारायण आशयेकर, महेश गवंडे, निळकंठ सावंत, सुधीर परब उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर यांनी सांगितले की आतापर्यंत अनेक वर्ष दशावतार कलावंत आपल्या न्याय हक्कासाठी भांडत आहेत मात्र त्यांना योग्य प्रकारे न्याय देण्यासाठी शासन सुद्धा पुढाकार घेत नव्हते विधानसभेमध्ये आमदार निलेश राणे यांनी कलावंतांचा आवाज बनवून जो काही शासनाची लढा दिला आणि आम्हा कलावंतांच्या मागे राहून कलावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार खासदार नारायण राणे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर, प्रमोद जठार जिल्हाप्रमुख दत्ता सामंत जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचेही आभार पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
कलावंतांपर्यंत पोहोचले पाहिजे पॅकेज संघाचे सल्लागार दत्तप्रसाद शेणई
या पत्रकार परिषदेमध्ये या संघाचे सल्लागार दत्तप्रसाद शेणई यांनी सांगितले की मुळात पॅकेज हे कलावंतांसाठी तयार केले जाते असे सांगितले जाते पण त्याचा लाभ हा कलावंतांना होत नाही कारण शासन हे पॅकेज कंपनीच्या मालकांना देतात पण मुळात कलावंतांना बुटा पासून ते मुकुटापर्यंत जो खर्च येतो तो कलावंतांना येतो तसेच रंगांचा खर्च सुद्धा कलावंत करतात म्हणून या पॅकेज मध्ये कलावंतांचा विचार केला जावा आणि मिळणारे पॅकेज हे कलावंतांपर्यंत यावे यासाठी समितीने आणि शासनाने प्रयत्न करावेत असे त्यांनी यावेळी सांगितले.













