ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावचा सुपुत्र युवा दृश्यकलाकार रोहित सुरेश वरेकर याचे “उंबरा : at an ancestral threshold” हे पहिल एकल कला प्रदर्शन नवी दिल्ली येथील Gallerie Nvya मध्ये आयोजित करण्यात आले आहे. Nvya Emerging Artist Grant 2024 चे विजेते म्हणून त्यांची निवड झाल्यानंतरचे त्याचे हे प्रदर्शन साकार होत आहे. या उदघाटन सोहळ्याला आज सायंकाळी ६ वाजता सुरुवात होणार असून 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे.या वेळेत होणार असून ११ जुलै पासून ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हे सर्वासाठी खुले राहील. हे प्रदर्शन स्क्वेअर वन मॉल, साकेत डिस्ट्रिक्ट सेंटर, नवी दिल्ली येथे भरविण्यात आले आहे.
कोकणातील पारंपरिक घरांची वास्तुरचना, पावसाळी भूभाग, विस्थापन, स्मृती आणि पर्यावरणीय बदल यांभोवती फिरणाऱ्या अनुभवांना वरेकर यांनी आपल्या कलाकृतींतून मांडणी केली आहे. आज अनेक घरे पडझड झालेली तसेच सोडून दिलेली आहेत. घरांमधील लाकूड, दारे, खांब आणि इतर साहित्य वापरून त्यांनी सामूहिक स्मृतींचा शोध घेतला आहे.अनेक पिढ्यांचा सुख दुःखाचा सोबती असणारा ‘उंबरा’ ही केवळ घराची सीमा मर्यादाच नसते तर अनेक पिढ्या, सुख दुःखे, बऱ्या वाईट प्रसंगाना आणि आठवणींना जोडून ठेवणारी जागा आहे. आणि याच संकल्पनेतून या प्रदर्शन मांडले आहे.त्यामुळे कोकण आणि सांस्कृतिक व पर्यावरण वास्तवाचे संवेदनशील प्रतिबिंब या प्रदर्शनातून पाहायला मिळणार आहे.यातून पुनः एकदा कोकणातील माणसाच्या संवेदना कोंकणी माणसाच्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर मंडण्यात येणार आहे. रोहित वरेकर या युवकांने एक मोठी झेप आपल्या बुद्धी कौशल्यावर घेतली आहे.या प्रदर्शनाला भेट द्यावी असेही आवाहन रोहित वरेकर या युवकाकडून करण्यात आले आहे.













