खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात; २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

खेड | प्रतिनिधी :

खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात भरणे येथील जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉलमध्ये संपन्न झाला. संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत समाजातील सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्या मानसी जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, पंचायत समिती सदस्या नम्रता तांबट, पंचायत समिती सदस्या शमिका म्हादे, नगरसेविका दीप्ती शिगवण, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, माजी उपसभापती रामचंद्र आईनकर, माजी उपसभापती शांताराम म्हसकर, कुणबी ग्रामीणचे अध्यक्ष कृष्णा आग्रे गुरुजी, माजी आमदार तुबा कदम यांचे सुपुत्र अमित कदम, भरणेचे सरपंच संतोष गोवळकर, चिंचवलीचे सरपंच गणेश कांदेकर, कुणबी युवा संघटनेचे सूरज जोगळे, माजी अध्यक्ष विलास धामणे, माजी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, ओबीसी अध्यक्ष दीपक शिगवण, जिजाऊ संघटनेचे संदीप पाटील, अजगणीच्या सरपंच संजना बुरटे, कुणबी युवा संघटनेचे सचिव मच्छिंद्रनाथ मांजरेकर, बाळू सनगरे, डॉ. श्रीकांत चांदिवडे, संतोष गोमले, मंगेश बुरटे, सुधीर वैराग, सचिन गोवळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात समाजातील इयत्ता दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच खेड तालुक्यातील उत्कृष्ट शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून राजेश भागणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. साखरोली-मोरेवाडी येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सचिव श्रीकृष्ण खांडेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन ठोंबरे यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे आणि जिल्हा परिषद सदस्या मानसी जगदाळे यांनी खेड तालुका कुणबी कर्मचारी संघ शिक्षण, विद्यार्थी प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकी जपत राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजेंद्र चांदिवडे, सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, उपाध्यक्ष प्रकाश कोदारे, सल्लागार विलास धामणे, उपाध्यक्ष निलेश कांदेकर, तुकाराम काताळे, शरद कदम, प्रमोद म्हादे, कोषाध्यक्ष संदीप घाणेकर, नवनीत घडशी, संजय जाधव, राजेश भागणे, रविंद्र पाबे, भागोजी कडव, प्रशांत आंबेडे, संदीप फागे, संतोष तांबट, अंकुश भानसे, मनोहर मनवळ, रवींद्र जोगळे, सचिन जड्याळ, लक्ष्मण बाईत, चंद्रकांत रेवाळे, लक्ष्मण खाडे, महेश पवार, पूजा कोदारे, सिद्धी जाधव, रसिका रेवाळे, विद्या घडशी आणि ऋतुजा तांदळे यांनी विशेष परिश्रम घेतले.