रत्नागिरी | प्रतिनिधी : दि १५.८.२३ रोजी रतनागिरी आगारात नवीन अॅडराईड तिकीट मशीनच् वाहकांना वाटप करणयात आले. सर्वात पहिले मशीन रतनागिरी अक्कलकोट या बसवरील श्री. गुरव या वाहकास देउन शुभारंभ करणयात आला नवीन Android ETIM मशीन वाहकाला मशीन वापरण्यास सोईस्कर, मशीन द्वारे योग्यप्रकारे तिकिट देण्यास मदत, मशीनमधून कार्ड पेमेन्ट , कॅश पेमेन्ट, QR- code पेमेन्ट करण्याची सुविधा आहे. मशिनमुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील तिकिटाची देवाण-घेवाण सुखकर होणार आहे असे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.












