दोडामार्ग: प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, असलेले श्री. मेघश्याम गोपाळ देसाई (आण्णा) यांचे गुरुवार दि. १६ जुलै २०२६ रोजी पहाटे १ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९४ वर्षे होते.
आण्णा हे आपल्या मनमिळाऊ आणि मार्गदर्शक स्वभावामुळे संपूर्ण कोलझर गावात अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने देसाई कुटुंबावर तसेच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर कोलझर येथील स्थानिक स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.













