कुडाळ :
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीत शिकणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून कुडाळ शहरातील विविध भागांतील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ सकाळी १०.३० वाजता कविलकाटे येथे होणार असून त्यानंतर १०.४५ वाजता मशीद मोहल्ला, ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, ११.१५ वाजता नाडकर्णीवाडी आणि ११.३० वाजता श्री देव कुडाळेश्वरवाडी येथे छत्री वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमाला शहरातील सर्व नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती शिवसेना कुडाळ शहर प्रमुख श्री. अभिषेक गावडे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.












