आ. दीपक केसरकर यांचा मुंबईत कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा

मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

सावंतवाडी:

माजी शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुटुंबीयांच्या उपस्थितीत केक कापून त्यांना जन्मदिवसाच्या स्नेहपूर्ण शुभेच्छा देण्यात आल्या.

या घरगुती सोहळ्याला त्यांच्या पत्नी तथा सावंतवाडी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, नातू अर्जुन यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या सावंतवाडी मतदारसंघात विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांकडून आणि चाहत्यांकडून ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.