मसुरे | झुंजार पेडणेकर :सांताक्रुज, मुंबई येथील बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट या न्यासाकडून मालवण तालुक्यातील विविध शाळांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबईचे संस्थापकीय अध्यक्ष व कांदळगावचे सुपुत्र कै. दिनकरराव दौलतराव राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याची सुरू केलेली परंपरा त्यांचे सुपुत्र तथा न्यासाचे विद्यमान अध्यक्ष श्री. नंदकुमार दिनकरराव राणे यांनी पुढे सुरू ठेवली आहे. यावर्षी या न्यासाच्या वतीने ओझर विद्यामंदिर, कांदळगाव, कुडाळकर हायस्कूल, मालवण, लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळा, मालवण ह्या माध्यमिक शाळामध्ये तसेच जि. प. प्राथमिक शाळा, कांदळगाव नं. १, जि.प. प्राथमिक शाळा, कांदळगाव, नं.२ परबवाडा, जि. प. प्राथमिक शाळा, कोळंब-कातवड, जि.प. प्राथमिक शाळा, पेंडूर नं.१ ह्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल शिक्षक व पालक वर्गातून न्यासाचे कौतुक करण्यात येत आहे.










