राजापूर व लांजा तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक

आ. किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बैठक

राजापूर प्रतिनिधी :  राजापूर व लांजा तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक २४ जुलैर् रोजी दुपारी १२.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील सभागृहा विशेष आढावा बैठक होणार आहे.
राजापूर व लांजा तालुक्यातील आंबा व काजू उत्पादन शेतकऱ्यांनी सन २०२५-२६ च्या हंगामात प्रतिकूल हवामान, अवकाळी पाऊस, कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच दिनांक ०९ मे २०२६ रोज झालेल्या तीव्र वादळामुळे पिकांचे झालेल्या नुकसानीसंदर्भात विविध मागण्यांचे एक निवेदन मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघ, आडिवरे यांनी १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना दिले होते. सद निवेदनामध्ये प्रामुख्याने कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी, रु. ५०,०००/- प्रोत्साहनपर अनुदानासाठी माहिती संकलन, पीक विम परताव्याचे वितरण, रासायनिक खते व कीटकनाशकांवरील वस्तू व सेवा कर (GST) रद्द करण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा वन्यप्राण्यांमुळे विशेषतः वानरांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीवर नियंत्रणासाठी उपाययोजना, तसेच आंबा व काजू पिकांवरील रो संशोधन केंद्र व अत्याधुनिक परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करणे इत्यादी एकूण १३ महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे.
याबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी, संबंधित विभागांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती जाण घेण्यासाठी, प्रलंबित विषयांवर समन्वयाने निर्णय घेण्यासाठी तसेच आवश्यक त्या पुढील उपाययोजना निश्चित करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजत करण्यात आले आहे.
तरी या बैठकीला राजापुर, लांजा तालुक्यातील शेतकरी व संबधित विभागाच्या अधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यलयाच्या वतीने करण्यात आले आहे.