मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजन
राजापूर प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्ताने भाजपाच्या वतीने गुरुवार २३ जुलै रोजी राजापूर ग्रामीण रूग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबीरात तब्बल ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजीचच वाढदिवस भाजपाच्या वतीने राज्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राज्यभरात भाजपाच्या वतीने महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राजापुरातही भाजपाने गुरूवारी २३ जुलै रोजी या महारक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराचा शुभारंभ आमदार प्रमोद जठार यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून अनेक रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होत असून, समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या शिबिरातून पार पडले. या शिबीराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवदिला. या शिबीरात १२३ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता, यापैकी ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हा शासकिय रूग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीच्या रक्तकेंद्रच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी आमदार प्रमोद जठार यांसह भाजपा जिलहा सरचिटणीस व उपसभापती अभिजित यशवंत गुरव तालुका अध्यक्ष मोहन अशोक घुमे, एड. एकनाथ मोंडे, संदीप तेरवणकर, अनिल करगुटकर, संदेश विचारे, अमोल सिनकर, महेश मंचेकर, अमर वारेशे, प्रल्हाद तावडे, फारुख साखळकर, नगरसेविका सुयोगा जठार, शिल्पा मराठे, श्रुती ताम्हनकर, स्वाती करगुटकर, रेणुका गुडये, शीतल पटेल, सुधा चव्हाण, शीतल रहाटे, समीर शिंदे, दीपक बावकर, रसिका कुशे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबिरासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालय, जिल्हा शासकिय रूग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीच्या टीमने तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष सहकार्य केले.
फोटो 23 आरजेपी 9
राजापुरात भाजपाच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबीरात रक्तदान करताना तालुका अध्यक्ष मोहन घुमे याप्रसंगी आ. प्रमोद जठार, अभिजित गुरव, एड. मोहन घुमे यांसह भाजपा पदाधिकारी.













