संतोष कोत्रे लांजा-: महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज सोमवारी पी एम श्री जि प पू प्रा शाळा लांजा नं.५ या.- शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली.
लांजा शाळा नं. ५ या जिल्हा परिषदेच्या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शाळेच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे. या पार्श्वभूमीवर श्री. सोनवने (OSD) यांनी आज सोमवारी सकाळी १०.५१ ला अचानक फोन करून शिक्षणमंत्री दादा भुसे आपल्याशी संवाद साधत आहेत अशी माहिती दिली. त्यानंतर त्वरित मंत्री महोदयांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आठवी, सातवी, पहिली या वर्गातील विद्यार्थ्यां शी संवाद साधून पटावरील शिक्षक संख्या, उपस्थित शिक्षक संख्या तसेच विद्यार्थी पटसंख्या याविषयी माहिती घेतली.विद्यार्थ्यांच्या आरोग्यापासून ते शैक्षणिक प्रगतीविषयी प्रत्यक्ष माहिती घेतली… विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून वाचन घेतले… तसेच शाळेतील विविध उपक्रम विषयी माहिती घेतली. तसेच शाळेच्या अडीअडचणी बाबत सुद्धा चौकशी केली. शाळेला आवश्यक गरजा, याविषयी माहिती घेतली, तसेच शाळेला इयत्ता नववीचा वर्ग सुरू करण्यासंदर्भात रत्नागिरी जि प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रानडे यांच्याशी त्वरित संपर्क केला.
संचमान्यता मुळे शाळेतील दोन शिक्षक अतिरिक्त झाल्याचे व मुख्याध्यापक पद रिक्त असल्यामुळे तसेच शाळेची पटसंख्या ४६९ असून अध्यापनावर पडत असलेला ताण पहाता… शाळेला पुरेसा शिक्षक वर्ग मिळेल असे सांगितले. त्यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर यांच्याशी व शाळेतील शिक्षक वर्ग यांच्याशी संवाद साधला… शैक्षणिक कामकाजाला शुभेच्छा देऊन शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
आमदार किरण सामंत यांनी शाळेला दत्तक घेतले असून ६० लाखाचा फंड उपलब्ध करून शाळेचे नुतनीकरण केले असल्याची माहिती यावेळी
मुख्याध्यापक विश्वनाथ सुर्वे यांनी दिली.
शाळेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत तीन वर्ग खोल्या व जि प कडून तीन वर्गखोल्यांचे सुरू असलेले बांधकाम मंत्री महोदयांनी पाहिले.शाळेमध्ये पीएम श्री मधून मैदान सपाटीकरण सुरू असलेल्या कामाची पाहणी सुद्धा मंत्री दादा भुसे यांनी केली.
सलग चार वर्षे नासा इस्रो मध्ये विद्यार्थी यश मिळवत असून.. शिष्यवृत्ती , नवोदय ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत विभागीय पातळीवर शाळेचा त्रुतिय क्रमांक आल्याचं तसेच स्काऊट गाईड, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय रंगभरण स्पर्धा ,योगाचे नियमित वर्ग,मुलींचे स्वसंरक्षण, कराटे,चेस , व्हर्चुअल क्लासरूम,२५ संगणक व इट्रक्टीव्ह बोर्ड सहीत सुसज्ज संगणक कक्ष, प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही, शाळेमध्ये इंटरनेट, वायफाय,विज्ञान प्रयोगशाळा आदी पुरक उपक्रम सुरू असल्याची माहिती यावेळी मुख्याध्यापक विश्वनाथ सुर्वे यांनी मंत्री दादा भुसे यांना दिली.