गुहागर प्रतिनिधी
रिगल पब्लिक स्कूलच्या कु.क्रियांश अनिल गिते या इयत्ता 2 रीच्या विद्यार्थ्याने 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी दिनांक 19 जुलै 2026 रोजी झालेल्या 10 वर्षाखालील तालुकास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रवेश मिळविला तसेच दिनांक 26 जुलै 2026 रोजी आयोजित जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळविले आणि टीममध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले.
क्रियांशच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूणचे अध्यक्ष मा. श्री.संजयराव शिर्के,संचालिका डॉ.सुमिता शिर्के , संचालक मा.श्री.अनिश शिर्के, रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे,रिगल पब्लिक स्कूलच्या समन्वयक सौ. सुखदा पोतदार,सर्व संचालक मंडळ व प्राध्यापकवर्ग यांनी अभिनंदन केले.












