खतांची अनधिकृत विक्री; जाकादेवीतील दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथे बाजारपेठेतील दुकानात अनधिकुतपणे तब्बल 54 हजार 160 रुपयांच्या खताचा साठा केल्याप्रकरणी दुकान मालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 29 जुलै रोजी सकाळी 10 वा. करण्यात आली.

मिलिंद केशव सावंत (रा.खालगाव जाकादेवी,रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍यांच्या विरोधात राजेंद्र कुंभार (52,रा.खेडशी,रत्‍नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, संशयिताने जाकादेवी बाजारपेठेतील आपल्या श्रीसाई कृपा ॲग्रो कृषी निविष्ठा विक्रि केंद्र या दुकानात त्‍याच्याकडे खत विक्री व साठा करण्याचा कोणताही परवाना नसताना तब्बल 54 हजार 160 रुपयांच्या खताचा साठा केला होता. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.