कारिवडे येथिल श्री गवळदेवाचा वार्षिक जत्रोत्सव 31 रोजी

Google search engine
Google search engine

सावंतवाडी | प्रतिनिधी : कारीवडे येथिल श्री गवळदेवचा वार्षिक जत्रोत्सव 31 डिसेंबर रोजी होणार आहे. श्री गवळदेव हे गवळी समाजाचे आराध्यदैवत असून वार्षिक उत्सवानिमित्त हजारो भाविक देवाचे दर्शन घेतात यानिमित्त मंदिरात सकाळी आठ वाजता पुजा अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा व दुपारी 2 वाजता महाप्रसाद होणार आहे. रात्री 12 वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गवळी समाज बांधवांनी केले आहे.