रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर अखंड महाराष्ट्र राज्यातील महिलांचे पहिले कोकणातील सांस्कृतिक व पारंपारिक वारसा जपणारे महिलांचे सादर होणारे नमन
म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक अध्यात्मिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ रत्नागिरी या संस्थेने निर्माण केलेले माऊली महिला नमन मडळ रत्नागिरी
या महिला नमन मंडळाने मुबंई रत्नागिरी या जिल्ह्यात अल्पावधीतच 45 प्रयोग सादर करून कला क्षेत्रातील आपला महिलांचा ठसा उमटवला आहे
पुरुषाच्या बरोबर राहून आपणही काहीतरी करु शकतो हि जिद्द आणि विश्वास ठेवून हे शिवधनुष्य या महिलांनी उचलून आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि जेष्ठ नमनसम्राट लेखक दिग्दर्शक श्री यशवंत वाकडे,श्री सागर मायगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्माता श्री साईनाथजी नागवेकर श्री शरदजी गोळपकर श्री दादा वाडेकर श्री वासुदेव वाघे श्री मदनजी डोर्लेकर यांच्या सहकार्यामुळेच हे नमन मंडळ एक एक पाऊल पूढे टाकताना दिसत आहे आणि म्हणूनच गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने संकल्प कला मंच रत्नागिरी या सस्थेने मान्यवरांच्या उपस्थितीत या नमन मंडळाला सन्मानचिन्ह, व प्रमाणपत्र देवून सन्मानित केले
या नमनामध्ये सौ पूनम गोळपकर,सौ प्रेरणा विलणकर सौ वेदा शेट्ये सौ,अर्चना मयेकर,श्रीमती ज्योती कदम श्रीमती माधवी पाटील सौ आकांक्षा वायंगणकर सौ वेदा शेट्ये सौ शितल सकपाळ सौ विनया काळप, सौ रिमा देसाई, सौ विणा भागवत, सौ रेश्मा शिंदे सौ समिक्षा वालम,सौ सर्वता चव्हाण,कु पूर्वा चव्हाण, कु मनस्वी साळवी कु आदिती पवार, कु शोभना वरवटकर कु स्वीटी पावसकर कु निधी वरवटकर कु शिवानी मयेकर आदी कलाकार म्हणून आपल्या भूमिका उत्कृष्टरित्या सादर करत आहेत मुख्य गायिका आकांक्षा वायगणकर यांना साथ संगत करणारे श्री परशुराम घवाळी, श्री साई घवाळी, ढोलकी कु पार्तेज आंबेरकर हे उत्तम साथ संगत करत आहेत त्यामुळेच नमन
उत्तम सादरीकरण करताना तोच पुरुषी जोश पाहून रसिक श्रोत्येही या कलाकारांना प्रोत्साहन देवून दाद आहेत हा सत्कार या पूढेही आम्ही सत्कारणी असे उदगार या नमन मडळ कलाकारांनी काढले या सन्मान प्रसंगी सर्वत्र या नमन मंडळाचे कौतुक होत आहे












