१००% कर्जवसुली करणाऱ्या ९ प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास संस्थांचा दोडामार्ग येथे गौरव

दोडामार्ग (सुहास देसाई):सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास संस्थांचे मार्गदर्शन आणि १०० टक्के कर्जवसुलीची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा सत्कार सोहळा दोडामार्ग येथील सुशीला सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी अध्यक्ष मनिष दळवी यांनी शेतकरी हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. कर्जप्रस्ताव मंजुरीतील दिरंगाई संपविण्यासाठी जिल्हा बँकेने ‘सुगी ॲप’ (Sughi App) विकसित केले असून, याद्वारे कागदपत्रे अपलोड होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाईल. तसेच ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमंजुरीचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत जलद गतीने कर्ज उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
९ विकास संस्थांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान
तालुक्यातील १२ पैकी ९ विकास संस्थांनी १०० टक्के कर्जवसुलीचा मान मिळवला आहे. याबद्दल:
दोडामार्ग,सासोली,मणेरी,आयी,वझरे,तळकट,कळणे,कोलझर
परमे या विकास सेवा संस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना मनिष दळवी म्हणाले की, गावच्या विकास संस्थांचा कारभार अधिक पारदर्शक व सक्षम करण्यासाठी संगणकीकरणावर भर दिला जात आहे. महाराष्ट्र शासनाने विविध सुविधा केंद्रे चालविण्यास परवानगी दिली आहे.
विकास सस्थांचा विचार करता जिल्ह्यातील सस्थां सचिवांना किमान १७,५०० रुपयांचे मानधन मिळत असून, या केंद्रांच्या बळकटीकरणासाठी जिल्हा बँक तिच्या नफ्यातून ७० ते ८० लाख रुपयांचा खर्च करत आहे.
सध्या विकास संस्थांमार्फत दोडामार्ग तालुक्यात सुमारे साडेदहा कोटी रुपयांचा कर्जपुरवठा होत असून, संस्थांनी सभासद बैठका घेऊन उलाढाल वाढवावी.पश्चिम महाराष्ट्रात एक विकास सस्थां दहा ते बारा कोटी व्यवहार करतात त्यामुळे आपण व्यवसाय वाढवीला पाहिजे असे मत मांडले
ते पुढे म्हणाले की, विकास सस्थां कर्ज पुरवठा करतात पण राज्य व केंद्र शासनाकडून दोन वर्षांच्या व्याज सवलतीची रक्कम येणे बाकी असले, तरी ती शेतकऱ्यांकडून वसूल करू नये. पात्र व अपात्र शेतकऱ्यांची स्पष्ट वर्गवारी करून पारदर्शक कारभार करावा.
या सोहळ्यास जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, गणपत देसाई, विठ्ठल देसाई, रवी मडगावकर, व्हिक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, महेश सारंग, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह तालुक्यातील विविध विकास संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी आणि बँक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












