वंचित घटकाला न्याय देण्यासाठी विधान भवनात भांडत असतो आमदार निलेश राणे

कुडाळ येथे संपन्न झाले छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर

कुडाळ प्रतिनिधी
या भागातील वंचित घटकांचा आवाज म्हणून मी विधानभवनात दिसतो गेली अनेक वर्ष या भागांमध्ये असलेल्या वंचित घटकांचा आवाज दबलेला होता असे आमदार निलेश राणे यांनी सांगून मी जरी सत्तेत असलो तरी माझ्या भागातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी भांडत असतो असे त्यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिरात सांगितले.

कुडाळ व मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराज व अभियान अंतर्गत समाधान शिबिर कुडाळ येथे आयोजित केले होते यावेळी आमदार निलेश राणे प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आंग्रे जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे, आरती पाटील, सुप्रिया वालावलकर नागेश आईर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, मालवण तहसीलदार गणेश सावे, गटविकास अधिकारी मनोज भोगटे मालवण गटविकास अधिकारी राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्ताने हे अभियान सुरू केले आहे महायुतीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्वर्गीय अजित पवार हे तिन्ही नेते जनतेसाठी अहोरात्र झटणारे नेते आहेत. जनसेवेचा वसा घेतलेले हे नेते त्यांना काम सुद्धा त्याच पद्धतीचे अपेक्षित आहे म्हणूनच हे अभियान आहे हे अभियान फक्त एका दिवसापूर्वी राबवून चालणार नाही शेवटच्या घटकापर्यंत हे अभियान राबवून हे प्रशासन त्यांचे आहे त्यांच्यासाठी काम करत आहे हे त्यांना समजले पाहिजे ज्या शासनाच्या योजना आहेत या योजना या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
विधानसभेतील माझ्या कामकाजाबद्दल माझे कौतुक होत आहे पण हे खरे कौतुक माझे नाही तर माझ्यातील कोकणातील अनेक भागांमध्ये विकास पोहोचलेला नाही तो आवाज विधान भवनात माझ्या रूपाने असतो अजूनही अनेक भागांमध्ये असलेल्या वंचित घटकांना शोधून ते विषय मी विधान भवनात मांडतो आणि हे विषय प्रत्येकाला आपले वाटतात म्हणून माझं कौतुक होत आहे गेले अनेक वर्ष हे विषय कोणी मांडले नाहीत ते दबलेले होते. त्या वंचितांचा आवाज बनून मी ते विषय मांडले तेव्हा कोणताही विचार केला नाही मी सत्तेत आहे याचाही विचार केला नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ते म्हणाले की हे अभियान कार्यक्रमापूर्ती न राहता प्रत्येक घटकापर्यंत योजना गेल्या पाहिजे रस्त्यावर उतरून हे काम झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत असलेल्या स्टॉलला आमदार निलेश राणे यांनी भेट दिली. यावेळी विविध योजनांतील लाभार्थ्यांना मिळालेल्या लाभांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार कुडा तहसीलदार सचिन पाटील यांनी मानले.