सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.चे अध्यक्ष मा. मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त बँकेतील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी कर्मचाऱ्यांनी दळवी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि निरंतर यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सातत्याने प्रगती होत राहो, अशी सदिच्छाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी बँकेतील तात्पुरते कर्मचारी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त आनंदी वातावरणात हा शुभेच्छा भेटीचा कार्यक्रम पार पडला.