देवगड l प्रतिनिधी : देवगड तहसिल कार्यालयामध्ये दि. 5 ऑगस्ट 2026 राेजी डिजीटल हयात दाखले नाेंदणी शिबीर आयाेजित करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य नाेंदणी अंतर्गत संजय गांधी व श्रावणबाळ याेजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी डिजीटल हयात दाखले नाेंदणी करणे आवश्यक असून देवगड तालुक्यात देवगड आणि जामसंडे गावांमध्ये मिळून 180 लाभार्थी संजय गांधी याेजना व श्रावणबाळ याेजनेचा लाभ घेत आहे.हयात दाखले(डिएल्सी) एकाच छताखाली डिजीटल नाेंदणी करण्याचा उद्देशाने डिजीटल हयात नाेंदणी हे विशेष शिबीर 5 ऑगस्ट राेजी सकाळी 10 ते 5 या वेळेत आयाेजित करण्यात आले असून या शिबीरात देवगड व जामसंडे मधील लाभार्थ्यांनी सहभागी हाेवून आपले हयात दाखले नाेंदणी करून घ्यावेत असे आवाहन देवगड तहसिलदार शीतल जाधव यांनी केले आहे.लाभार्थ्यांनी साेबत आपले आधार कार्ड व ओटीपीसाठी माेबाईल आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.










