बांदा येथे इमारतीवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

 

 

बांदा : प्रतिनिधी

बांदा – काळसेवाडी परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून एका परप्रांतीय तरुण कामगाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत कामगार अवघ्या १० दिवसांपूर्वीच रोजगाराच्या शोधात शहरात आला होता.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, काळसेवाडी येथील एका इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. या ठिकाणी काम करत असताना अचानक तोल गेल्याने हा तरुण कामगार इमारतीवरून खाली कोसळला. अत्यंत उंचावरून पडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.