महसूल सहाय्यक विजय झिमा इंदवटकर यांचा महसूल दिनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव

लांजा (प्रतिनिधी): लांजा तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून काम करणारे विजय झिमा इंदवटकर यांचा महसूल दिनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, तहसीलदार कार्यालय, लांजा यांच्या वतीने महसूल दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महसूल सहाय्यक विजय इंदवटकर यांना तहसीलदार प्रियांका ढोले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., लांजा चे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष विलास दरडे, संचालक भालचंद्र कांबळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.