रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या नाचणे-श्रीरामनगर येथील घरात बेशूध्द अवस्थेत सापडून आलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना बुधवार 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली.
प्रसाद गणेश आंब्रे (26,रा.श्रीरामनगर नाचणे,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे मेहूणे संदिप प्रकाश राघव यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार,बुधवारी दुपारी 3वा.सुमारास प्रसाद आंब्रे हा राहत्या घरी बेशूध्द अवस्थेत मिळून आल्याने संदिप राघव यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. परंतू उपचारांपूर्वीच तो मयत झालयाचे तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
Home महत्वाच्या बातम्या नाचणे-श्रीरामनगर येथील घरात बेशूध्द अवस्थेत सापडलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू












