प्रतिनिधी/रोहन कांबळे
कोल्हापूर : गारगोटी येथे घेण्यात आलेल्या गारगोटी हिल मॅरेथॉन २०२६ स्पर्धेत डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुल गारगोटी अंतर्गत श्रीमती वत्सलाताई पाटील हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज गारगोटीच्या विद्यार्थीनीनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे ५ कि.मी.महिलागट स्पर्धेमध्ये या प्रशालेची विद्यार्थीनी अनुजा नामदेव पाटील(भेंडवडे) हिने प्रथम क्रमांक पटकवला आहे तर द्वितीय प्रियांका पाटील, तृतीय फॅलीना डिसुजा, चतुर्थं क्रमांक मनाली बल्लाळ यानी पटकावला आहे चारही विद्यार्थिनींनी गेल्या एक वर्षापासून कठोर परिश्रम, नियमित सराव,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे या यशामागे प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील कासार क्रीडा शिक्षक शंभूराजे जाधव, सर्व शिक्षकवर्ग यांचे मार्गदर्शन व मेहनत मोलाची ठरली आहे या सर्व विद्यार्थीनींचे भुदरगड तालुक्यात कौतुक होत आहे.













